आयपीएल स्पर्धा रद्द करण्यासाठी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल

दिल्ली : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या संकटाच्या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा कोणत्याही अडचणीशिवाय यशस्वीरीत्या पार पडला होता.

मात्र आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने या स्पर्धेत शिरकाव केला. सोमवारी दिवसभरात २ आयपीएल संघातील आणि दिल्ली येथील ग्रांउड स्टाफमधील सदस्याना कोरोनाची लागण झाली. याच पार्श्वभूमिवर करन ठकराल आणि इंदर मोहन सिंग यांनी आयपीएलचे सर्व सामने रद्द करा आणि दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानाचं कोवीड सेंटरमध्ये रुपांतर कारा अशी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल केली आहे.

तसेच या याचिकेत नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न महत्वाचा असताना आयपीएलच्या सामन्याला परवानगी कशी देण्यात आली याबाबतही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी याचिकार्ते म्हणाले की ‘दिल्ली आणि देशात कोरोनाची परिस्थिती पाहता केंद्र सरकार, बीसीसीआय, आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सामन्यांना परवानगी देणं हे अयोग्य आहे. नागरीकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही, स्मशानभूमीत जागा नाहीये, ऑक्सिजन आणि औषधं मिळत नाहीयेत. या परिस्थितीत आयपीएलच्या सामन्यांचं आयोजन म्हणजे लोकांच्या मानसिक आरोग्याशी खेळ करण्यासारखं आहे असं मत याचिकाकर्त्यांनी व्यक्त केलंय.

महत्वाच्या बातम्या