Share

Bhagatsingh Koshyari | शिवाजी महारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांना भोवणार?, पदावरुन हटवण्यासाठी कोर्टात याचिका दाखल

Bhagatsingh Koshyari | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी शिवाजी महाजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत त्यांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केली होती. यानमतर सर्वत्र संताप पाहिला मिळाला आहे. तसं पाहता असं विधान करण्याची त्यांची पहिले वेळ नसल्याने आता अनेकांनी आक्रमक भूमीका घेतली आहे. अशातच त्यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून त्यांना पदावरुन हटवण्याची मागणी या याचिकेत केली आहे.

राज्यपालांनी जनतेतील एकोपा आणि शांतता बिघडवली आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 61 आणि 156 अंतर्गत महाभियोगाची कार्यवाही करण्याची मागणी करत हायकोर्टात फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. कलम 61 आणि 156 अंतर्गत राज्यपालांना हटवण्याचा निर्णय घेण्याची या याचिकेत मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. तर शिंदे गट, ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेसनेही राज्यपालांच्या विधानाचा निषेध केला. भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपालपदावरून हटवावे, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Bhagatsingh Koshyari | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी शिवाजी महाजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत त्यांची तुलना केंद्रीय मंत्री …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now