‘हिंदी राष्ट्रभाषा नाही’, राज ठाकरें विरोधात याचिका दाखल

टीम महाराष्ट्र देशा: दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय पंचायतीमध्ये केलेले तडफदार हिंदी भाषण देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. यावेळी बोलताना हिंदी ही राष्ट्रभाषा नसल्याचं विधान त्यांनी केले होते. राज यांच्या याच वक्तव्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी आपण लढत असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी उत्तर भारतीय पंचायतमध्ये जोरदार भाषण दिले होते. यावेळी त्यांनी उत्तर भारतीय राज्यांचा विकास न करणाऱ्या नेत्यांना खडेबोल सुनावले. विशेष म्हणजे राज यांनी यावेळी हिंदीमध्ये भाषण केले.

भाषणा दरम्यान ठाकरे यांनी हिंदी ही राष्ट्रभाषा नसल्याचं विधान केल्याने त्यांनी हिंदी भाषेचा अपमान केला, अशी याचिका मुज्जफरनगरचे सामाजिक कार्यकर्ते तमन्ना हाश्मी यांनी मुख्यन्यायाधीश आरती कुमार सिंग यांच्या न्यायालयात केली आहे.

ब्रेकिंग : राज ठाकरे मुंबई महापालिकेत दाखल