फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापनासाठी असा भरा अर्ज

टीम महाराष्ट्र देशा : फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेला प्रशासकीय मान्यता आहे. शासन निर्णय क्र. राकृवियो-2015/प्र.क्र.327/9-अे, दिनांक-05 जानेवारी, 2016 असा या योजनेचा प्रकार आहे.

आंबा, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी व चिक्कू या पिकांवरील कीड, रोगांचे सर्वेक्षण करुन त्याबाबत उपाययोजनेसाठी सल्ला देणे असा या योजनेचा प्रकार आहे. सर्व प्रवर्गातील शेतकरी वर्गासाठी ही योजना लागू आहे. शेतकयाकडे स्वत:चे फळबाग क्षेत्र असावे अशी या योजनेची प्रमुख अटी आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज, 7/12 व 8-अ उतारा ही कागदपत्रे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत किड सर्वेक्षकांमार्फत प्रत्यक्ष बागांना भेट देऊन किड / रोगांसंबधात निरीक्षणे घेण्यात येत आहेत. त्यानंतर राष्ट्रीय संशोधन केंद्र, कृषि विद्यापीठे यांचे मदतीने सल्ले तयार करण्यात येत असून माहिती तंत्रज्ञानाद्वारे सदरची माहिती एस.एम.एस. द्वारे व जंबो झेरॉक्स द्वारे शेतकयांना उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तसेच कीड/ रोगाचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या वर गेल्यावर आपत्कालीन परिस्थितीत 50 टक्के अनुदानावर औषधे तालुकास्तरावरुन उपलब्ध करुन दिली जातात, असे दिल्या जाणार लाभाचे स्वरूप आहे.

नमुना अर्जामध्ये शेतकयाने स्वत:ची माहिती भरुन आवश्यक कागदपत्रांसह (7/12 व 8-अ उतारा) संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावा अशी अर्ज करण्याची पद्धत आहे. संबंधीत तालुका कृषि अधिकारी असा संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता आहे.

महत्वाच्या बातम्या