प्रितम मुंडेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्याला बेदम मारहाण

टीम महाराष्ट्र देशा : बीडच्या दबंग खासदार अशी ओळख असणाऱ्या भाजपच्या बीड लोकसभा उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे. बीडमधील अपक्ष उमेदवार कालिदास अपटे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार बजरंग सोनावणे तसेच दादा मुंडे यांनी प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर विविध आक्षेप घेतले आहेत. मात्र यावरूनच काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांना बीडमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे.

उमेदवारी अर्जावर सुनावणी सुरु असताना दादा मुंडे यांनी पहिला आक्षेप नोंदवला. त्यांचे एकूण तीन आक्षेप आहेत. पहिला आक्षेप नोंदवल्यानंतर ते वकिलासह खाली आले. खाली आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभे असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी दादा मुंडे यांच्यावर हल्ला केला. विशेष म्हणजे यावेळी पोलीसही बाजूलाच होते. पण पोलिसांनी हस्तक्षेप केला नाही, अशी तक्रार दादा मुंडे यांची आहे.

दरम्यान, प्रितम मुंडे याचं ‘प्रितम गोपीनाथ मुंडे’ नावाने बीड जिल्ह्यातील नाथरा येथे मतदान यादीत नाव आहे. तर मुंबई येथील वरळीमध्ये प्रीतम गौरव खाडे नावाने त्यांचं मतदार यादीत नाव असल्याची टीका कालिदास यांच्य़ाकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई वरळी येथील प्लॉट 1201 स्थावर मालमत्तेची माहिती प्रितम मुंडे यांनी लपवली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. प्रितम मुंडे यांच्याकडे वेगवेळ्या नावाने दोन आयकर विभागाचे ओळखप्रत्र आहे असंही कालिदास यांनी म्हटलं आहे.

2 Comments

Click here to post a comment