fbpx

रजनीकांतच्या घरी बॉम्ब लावण्याची धमकी

person-threatened-to-plant-bomb-in-rajnikanth-and-cm-e-palanisamy-house

चेन्नई – एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन दाक्षिणात्य सुपरस्टार ‘थलैवा’ रजनीकांत आणि मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या घरी बॉम्ब लावण्याची धमकी दिली. एकाच क्रमांकावरुन दोन वेळा फोन करून धमकी देण्यात आली. प्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरू केली असून याआधीही अशाप्रकारे फोन आले असल्याची माहिती पोलीसानी दिली.

एएनआयाने दिलेल्या वृत्तानुसार, पहिला फोन दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी आला. अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या घरी बॉम्ब लावण्याची धमकी दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या घरी बॉम्ब निष्क्रिय करण्याचं पथक पाठवून तपासणी करण्यात आली. तर त्याच क्रमांकावरुन धमकीचा दुसरा फोन संध्याकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी आला आणि त्या व्यक्तीने रजनीकांतच्या घरी बॉम्ब लावण्याची धमकी दिली. फोन ट्रेस केल्यानंतर धमकीचा फोन कड्डालोर जिल्ह्यातून आला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.