fbpx

धक्कादायक! महावितरणने पाठवले ८ लाखांचे बिल; ‘त्याने’ घेतला गळफास

औरंगाबाद – महावितरणने 8 लाख 65 हजारांचं वीज बिल पाठवल्याने, त्याचा धसका घेत औरंगाबादमधील एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जगन्नाथ शेळके असे या व्यक्तीचे नाव आहे. औरंगाबाद शहरातील भारतनगर भागात राहणाऱ्या जगन्नाथ शेळके यांना महावितरणने 8 लाख 65 हजार रुपयांचं वीज बिल पाठवलं. या बिलाचा धसका घेत जगन्नाथ शेळके यांनी आत्महत्या केलीये.

जगन्नाथ शेळके यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. शेळके यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली.“वीज बिल जास्त आल्यामुळेच आपण हे पाऊल उचलत आहोत.”, असे शेळके यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. सुसाईड नोट अंगावर चिटकवून शेळकेंनी गळफास घेतला.दरम्यान महावितरणकडून, चुकीने हे बिल पाठवण्यात आलं होत.याप्रकरणी बिलिंग क्लर्क सुशील कोळी यांचं निलंबन करण्यात आले आहे.