#व्यक्तिविशेष : खा.छत्रपती संभाजीराजे भोसले ….दीनदुबळ्यांसाठी लोकहितासाठी, सर्वसामान्यांसाठी झटणारा खरा लोकनेता

Chhatrapati Sambhaji Raje Bhosale

पुजा झोळे : समाजात वावरत असताना असे खूप कमी लोक असतात की ज्यांची दखल घ्यावी, त्यांनी केलेल्या कामांचा आदर्श घ्यावा. ज्यांनी तरुणांसमोर काम करण्याचा एक नवा पायंडा पाडला. आपण चर्चा करत आहोत ते म्हणजे श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज(कोल्हापूर) यांची  नावाप्रमाणेच त्यांच्या कामांची आणि विचारांची संपत्ती खूप मोठी आहे.

कोल्हापूरच छत्रपती घराणं हे पहिल्या पासूनच आपल्या कार्याने लोकांमध्ये, जनसामान्यात प्रिय आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी दिलेलं मोलाचं योगदान हे महाराष्ट्रातील गावा-गावातील लोकांना माहीत आहे. शिक्षण, साहित्य, कला, खेळ या विषयांना या घराण्याने कायमच प्रोत्साहन दिले आहे. आणि त्याचाच वारसा हे त्या घराण्याचे आजचे युवराज छत्रपती संभाजी महाराज पुढं चालवत आहेत.

आपल्या राजा सोबत आपली भेट व्हावी, हे प्रत्येकालाच वाटत तस मलाही वाटायचं आणि तो प्रसंग सुद्धा आला, मी आणि सोबत सहकारी काही कामानिमित्त राजेंना भेटण्यासाठी गेलो, थोड्याच वेळात राजे देखील तिथं आले आणि अतिशय शांत,हळुवार पणे स्मित हास्य करून राजे बोलू लागले. माझ्या सोबत सर्वच जेष्ठ सहकारी होते सर्वजण राजेंसोबत बोलू लागले, आणि चर्चा सुरु झाली. मी काही वेळ फक्त बघत राहिले माझे सहकारी बोलत होते त्याला राजे अतिशय चांगल्या प्रकारे उत्तर देत चर्चा मस्त सुरु होती. मला पण वाटलं मी पण काहीतरी बोलावं आणि राजेंनी मला देखील उत्तर द्याव, आणि मग मी घाबरत घाबरत बोलले जे बोलले ते नॉर्मल होत तरी देखील राजे माझ्या बोलण्याकडे अतिशय चांगल्या प्रकारे कुतूहलाने बघत हास्यमय प्रतिसाद देत राहिले. आणि मग मी मात्र विसरूनच गेले मी राजेंशी बोलतेय इतकं ते साधं सरळ बोलणं मिसळून जाण, त्यांनंतर अनेक वेळा राजेंना भेटले पण अतिशय मनमिळावू, शांत, संयमी स्वभावाचे राजे त्यांच्यात नेहमीच मला राजर्षी शाहू महाराज दिसत.

Chhatrapati Sambhaji Raje Bhosale

खरं लोकशाही व्यवस्थेत काम करायचं असेल तर संसदेत जाण महत्त्वाचं आहे, आणि हे हेरल संभाजी राजांनी आणि त्यांना राष्ट्रपती कोट्यातुन खासदारकी मिळाली. त्या संधीचा उपयोग लोकहितासाठी,सर्वसामान्य जनतेसाठी करणारे छत्रपती संभाजी राजे हे त्याचं उत्तम उदाहरण आहे राजे कधीच कोणत्या पक्ष्याच्या विचाराला बांधले गेले नाहीत त्यांची स्वतःचीच अशी वयक्तिक विचारसरणी आहे ती म्हणजे लोकसेवेची…मराठा आरक्षणाची बाजू भक्कम पणे संसदेत मांडणार व्यक्तिमहत्व,19 फेब्रुवारी घरापासून ते दिल्ली पर्यँत नेणार व्यक्तिमहत्व म्हणुन महाराजांकडे पाहिलं जातं. फोनवर उपलब्ध असणारे, लोकांमध्ये मिसळणारे,त्यांच्या अडचणींना धावुन जाणार नेतृत्व म्हणुण महाराजांकडे पाहिल जात. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा …

निलेश राणे अडचणीत ! ‘हिजडा’ शब्द प्रयोगावरून तृतीयपंथांनी जळगावात केला गुन्हा दाखल

संभाजी महाराजांवरील कोणाचं प्रेम खरं, यावरून जयंत पाटील – आशिष शेलारांमध्ये चकमक

कुठलीही जातीय भावना दुखावली जाणार नाही, याची काळजी घेतली आहे : अमोल कोल्हे