सावधान उद्या रात्रच होणार नाही; नासानेही सांगितले हे भाकीत

वेबटीम: निसर्गाचं चक्र सुरू राहण्यासाठी दिवस आणि रात्र होणं अत्यंत गरजेचे आहे. मात्र एखाद दिवशी रात्रच झाली नाही तर. मानवी आयुष्याच सगळ गणितच बिघडून जाईल. मात्र सध्या १२ ऑगस्टला रात्र होणार नाही. हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे कमी की काय म्हणून काही वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनेलने पण अशा बातम्या प्रसारित केल्या आहेत.
जेव्हा पासून हा मेसेज व्हायरल होत आहे. सगळेच गोंधळात पडले आहेत. मात्र अशा मेसेज माघच नेमकं कारण काय आहे हे आधी आपण बघायला हव.
‘मिटीयोर शॉवर’ हे आहे या रात्रीचा दिवस करणाऱ्या या मेसेजमागचं खरं सत्य. १२ तारखेलाला नव्हे तर १०-११-१२ असे तीन दिवस मिटीयोर शॉवर पाहायला मिळणार आहे.

काय आहे मिटीयोर शॉवर ?
मिटीयोर शॉवर म्हणजे उल्कांचा पाऊस. आकाशात असा उल्काचा पाऊस होतो तेंव्हा उल्कांच्या तुकड्यांनी आकाश उजळून जातं आणि रात्र असूनसुद्धा दिवस असल्याचा भास होतो. पण उजेडाची तीव्रता नक्कीच एवढी नसते की रात्रीचा दिवस होईल. मात्र असे मेसेज व्हायरल करणाऱ्या सोशल मीडियातील वैद्यानिकांनी थेट नासाचाच दाखल दिलाय तसेच काही वृत्तपत्रातील बातम्यांचे स्क्रीनशॉट देखील पुरावा म्हणून दाखवले जात आहेत.