शेतकऱ्यांना पिक विमा वेळेत भरता यावा यासाठी प्रशासनाने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

naval kishor ram

पुणे : जिल्हयातील शेतक-यांना पिक विमा भरण्यासाठी कमी कालावधी शिल्लक राहिला असल्यामुळे शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहु नये. याकरीता जिल्हयातील शेतकऱ्यांना पिक विमा वेळेत भरण्यासाठी महा ई सेवा केंद्र व सामान्य सेवा केंद्र 31 जुलै 2020 पर्यंत सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत किंवा रांगेतील शेतकरी संपेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहे.

कोरोना (COVID-19) या विषाणु मुळे पसरत असलेला आजार संसर्गजन्य म्हणुन घोषित केलेला आहे. राज्य शासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोख्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 13 मार्च 2020 पासुन लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केले आहे. जिल्हयात कोराना बाधीत रुग्णांच्या संपर्कात लोकानी येवू नये म्हणुन फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सांयकाळी 5 ते सकाळी 7 या कालावधीत संपुर्ण जिल्हयात मनाई आदेश लागु केले आहे.

या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत सेतु केंद्र व महा ई सेवा केंद्र व केंद्र चालक/आदेशाचे पालन न करणारे कोणतेही व्यक्ती किंवा संस्था शिक्षेस पात्र असून संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस स्थानक प्रभारी अधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 व 52 तसेच साथरोग प्रतिबंधक 1897 अन्वये व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार व महाराष्ट्र कोविड उपाय योजना नियम 2020 मधील तरतुदी नुसार कायदेशीर कारवाई करणेत येईल. या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात अंमलात राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राम यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऐश्वर्या व आराध्या बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; मायलेकींना रुग्णालयातून डिस्चार्ज

आघाडी सरकारचे अपयश आक्रमकतेने मांडा; चंद्रकांत पाटलांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन