अधिकारांचा गैरवापर करून तत्कालीन विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.
संजय राऊत, एकनाथ खडसे यांसह इतर नेत्यांचे फोन टॅप करण्यासाठी केंद्राकडून परवानगी मागताना अँटी सोशल एलिमेंट असे म्हणत अर्ज केला गेला होता, अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.