बेळगाव महानगरपालिकेने महाराष्ट्र समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारली

Belgaum

बेळगाव- बेळगावात उद्या महाराष्ट्र समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकरण्यात आल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.यामुळे बेळगावच्या मराठी भाषिकांचा प्रश्न आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत असून मराठी भाषिकांमध्ये संतापाची भावना आहे.
महाराष्ट्र समितीच्या वतीने बेळगावात या मेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सीमा भागातले मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात सामील होतात. पण या मेळाव्याला बेळगाव महानगरपालिकेने परवानगी नाकारली आहे. पोलिसांच्या परवानगी नंतरच मैदान देऊ अशी भूमिका पालिकेने घेतली आहे. त्यातच उद्यापासून कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगावात सुरू होणार आहे. या अधिवेशनाचा मराठी भाषिक विरोध करणार आहे. या अधिवेशनाविरोधातदेखील  मराठी भाषिकांनी एल्गार केला आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...