‘मुंबई पोलीस फाऊंडेशन’च्या स्थापनेस परवानगी

मुंबई: ‘मुंबई पोलीस फाऊंडेशन’ या ट्रस्टच्या स्थापनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे मुंबई पोलिसांना खासगी संस्था आणि उद्योग समुहांकडून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत निधी स्वीकारता येणार आहे.

देणग्या स्वीकारता याव्यात यासाठी ‘मुंबई पोलीस फाऊंडेशन’ या ट्रस्टची स्थापना करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती पत्राद्वारे मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ऑगस्ट महिन्यात केली होती. पडसलगीकर यांच्या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयास परवानगी दिली. मात्र विश्वासार्हता असलेल्या संस्था आणि व्यक्तींकडूनच देणग्या स्वीकारता येतील, अशी अट गृहखात्याने ठेवली आहे.

You might also like
Comments
Loading...