सुरक्षेच्या कारणातून केजरीवालांच्या सभेला परवानगी नाकारली

film-on-cm-arvind-kejriwal-an-insignificant-man-trailer-festival-2016

बुलडाणा :  जिजाऊ जयंती निमित्ताने 12 जानेवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यातील सिंधखेड-राजा येथे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सभा होणार होती. परंतु, पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारली. राज्यातील परिस्थीती पाहता सुरक्षेच्या कारणातून ही परवानगी नाकारण्यात आल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी बी.एन. नलावडे यांनी सांगितले. आम आदमी पार्टीने जिजा मातेचे जन्मस्थान असलेल्या सिंधखेड-राजा येथील श्री संत भगवान बाबा महाविद्यालयात 12 जानेवारी रोजी सभेचे आयोजन केले होते. त्यासंदर्भात ना हरकत प्रमाणपत्र व इतर गोष्टींची शाहनिशा देखील झाली होती. यासंदर्भातील सर्व कायदेशीर सोपस्कार देखील पूर्ण करण्यात आले होते. परंतु, गेल्या 1 जानेवारी रोजी झालेली भीमा-कोरेगाव घटना आणि त्यानंतरच्या घडामोडी पाहता पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारली. सभेची प्रस्तावित जागा रहदारी आणि सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याचा पोलिसांचा निष्कर्ष आहे. दरम्यान आम आदमी पार्टीने इतरत्र सभा घेतल्यास काहीच हरकत नसल्याचे पोलिस विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.