Abdul Sattar | पुणे : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढ होत आहेत. टीईटी घोटाळा, गायरान जमीन घोटाळा, सिल्लोड येथे 1 ते 10 जानेवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय कृषि व क्रीडा महोत्सव प्रकरण हे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या चांगलंच अंगटल येऊ शकते. दरम्यान ऑगस्ट महिन्यात चर्चेत आलेल्या टीईटी घोटाळ्यासंदर्भात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वी टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलीचे नावे समोर आले होती. त्यानंतर या प्रकरणावर राजकीय पडदा टाकण्यात आला. त्यानंतर शिंदे सरकारने अब्दुल सत्तार यांना मंत्री केले.
दरम्यान नितीन संजय यादव यांना माहिती अधिकारात धक्कादायक माहिती मिळाली आहे. नितीन यादव म्हणाले, “शिक्षक भरतीवर राज्य शासनाने रितसर 2 मे 2012 पासून बंदी घातली आहे. तरी देखील विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची मुलगी शेख हिना कौसर अब्दुल सत्तार यांची 16 ऑगस्ट 2018 रोजी शिक्षण सेवक म्हणून कायम नेमणूक केली गेली. शासनाने ही नेमणूक करत असताना शिक्षण सेवक म्हणून कायम करण्यासाठी जे टिईटी प्रमाणपत्र बंधनकारक असते ते टिईटी प्रमाणपत्रच शासनाकडे उपलब्ध नसल्याचे कळवले आहे. म्हणजेच टिईटी प्रमाणपत्राविना अब्दुल सत्तार यांच्या मुलीची कायम नेमणूक कोणाच्या दबावावरुन केली गेली, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.”
“धक्कादायक म्हणजे, शासनास सादर केलेल्या आधार कार्ड, पॅनकार्ड व शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जन्मतारखेचा वेगवेगळा उल्लेख आढळून येत आहे. या तारखांमध्ये तफावत आहे. सोबत दुसऱ्या मुलीची माहितीच त्यांच्या कार्यालयात उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शासनाची फसवणूक करुन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरुन तर हा शिक्षक घोटाळा झाला नाही ना? याची चौकशी होणे गरजेचे आहे,” अशी मागणी नितीन यादव यांनी केली आहे.
यापूर्वी शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या घोटाळ्यामध्ये दोषी आढळलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. ही यादी परीक्षा परिषदेकडून जारी करण्यात आली होती. यामध्ये तब्बल 7 हजार 874 विद्यार्थ्यांच्या नावाचा समावेश होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रकरणात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे आली होती. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी त्यांच्या मुलींची नावं आहेत. या दोन्ही मुली टीईटी घोटाळ्यामध्ये दोषी आढळल्या होत्या.
विरोधकांनी टीका केल्यानंतर यावर सत्तारांनी स्पष्टीकरण दिले होते. “माझ्या मुलींनी परीक्षा दिली होती. मात्र त्या पात्रच झाल्या नाहीत मग त्यांची नावं या यादीत आलीच कशी? माझ्या मुली या माझ्याच संस्थेत 2017 साली नोकरीला लागल्या आहेत. त्यानंतर त्यांनी ही परीक्षा दिली होती. मात्र त्यात त्या दोघीही अपात्र ठरल्या. त्याची प्रमाणपत्र देखील माझ्याकडे आहेत. त्याची कॉपी कुणाला हवी असल्यास मी देऊ शकतो. माहितीच्या अधिकाराखाली शिक्षण खात्यातील कोणतीही माहिती कुणीही मिळवू शकतो. त्यामुळे जर माझ्या मुली त्यात दोषी आढळल्या तर कारवाई करावी, पण जर त्यांची यात काही चूक नसेल तर मात्र ज्यांनी हा बदनामीचा कट रचला आहे. त्यांना फासावर लटकवलं पाहिजे”, अशा शब्दात अब्दुल सत्तार यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.
मात्र अब्दुल सत्तार यांच्या म्हणण्यानुसार टीईटी परीक्षा पात्र नसताना आणि शिक्षक भरतीवर बंदी असताना अब्दुल सत्तार यांची मुलगी सेवेत कायम कशा झाल्या?, यामध्ये राजकीय दबाव होता?. मोठा घोटाळा यामध्ये झाला का, असे विविध प्रश्न निर्माण होत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Urfi Javed | उर्फी जावेदचा बेभान अंदाज, नाश्त्याच्या प्लेटने झाकले शरीर
- Budget Car | 6 लाख रुपयांच्या रेंजमध्ये बाजारात उपलब्ध आहेत ‘या’ जबरदस्त कार
- Hair Care | केसांना दाट आणि मजबूत बनवण्यासाठी कापुराचा ‘या’ प्रकारे करा वापर
- IND vs SL | श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये विराटची जागा घेणार ‘हा’ खेळाडू?
- OnePlus Mobile | भारतात लवकरच लाँच होऊ शकतो OnePlus 11 5G, जाणून घ्या फीचर्स