Share

Periods Hacks | अनियमित मासिक पाळी पासून आहात परेशान? तर फॉलो करा ‘या’ टीप्स

टीम महाराष्ट्र देशा: आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रामुख्याने महिलांना मासिक पाळी च्या संबंधित समस्यांना झुंज द्यावी लागते. या समस्या मुख्यतः हार्मोनियम बदलांमुळे होऊ लागतात. मासिक पाळी दरम्यान महिलांना पाठ दुखी, चक्कर येणे, थकवा जाणवणे इत्यादी समस्या निर्माण होतात. ज्या महिलांना मासिक पाळी 22 किंवा 23 व्या दिवशी येते त्यांना आरोग्यदायी मासिक पाळी असे मानले जाते. पण जर तुम्हाला अनियमित मासिक पाळीच्या समस्या येत असेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्याचबरोबर जर तुमची मासिक पाळी आठ दिवसांपेक्षा जास्त काळ राहत असेल तर त्याला देखील अनियमित मासिक पाळीचे लक्षण गृहीत धरण्यात येते. तणाव, अस्वस्थता आणि पोषक अन्न न मिळाल्यामुळे अनियमित मासिक पाळीच्या समस्या उद्भवू लागतात. अनियमित मासिक पाळी का होऊ लागते आणि त्यांना नियमित करायसाठी आपण काय करू शकता याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

मासिक पाळी मध्ये येणारी अनियमितता

व्यायाम

शरीरासाठी व्यायाम नेहमी चांगला मानला जातो. व्यायामामुळे शरीर सुदृढ आणि निरोगी राहते. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला तर त्याचे उलटे परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतात. तसेच अति व्यायाम केल्याने मासिक पाळी मध्ये अनियमितता येते. त्यामुळे महिलांनी अधिक व्यायाम करणे टाळावे.

वजन

अनियमित मासिक पाळी होण्यामध्ये वजन हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तुमचे वजन जास्त वाढले किंवा वेगाने कमी झाले तर तुम्हाला अनियमित मासिक पाळीच्या समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते.

आहार

पोषक आहार न मिळाल्यामुळे मासिक पाळी मध्ये अनियमितपणा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वेळेवर आणि पोषक आहार हा नियमित ग्रहण गेला पाहिजे.

अनियमित मासिकपाळी वरील उपाय

बीट

बीटामध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यामध्ये आयरन, फॉलिक, ऍसिड इत्यादींचा समावेश होतो. ही पोषक घटके अनियमित मासिक पाळीच्या समस्येवर रामबाण इलाज आहे. त्यामुळे महिलांनी त्यांच्या आहारात बीटाचा समावेश केला पाहिजे.

कच्ची पपई

कच्च्या पपईमध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटकांचा समावेश असतो. यामध्ये आयरन, कॅरोटीन, कॅल्शियम आणि विटामिन A आणि C यांचा समावेश होतो. त्यामुळे कच्च्या पैसे नियमित सेवन केल्याने मासिक पाळीत मधील अनियमितता दूर होईल.

सुखे आले

सुकलेले आले अनियमित मासिक पाळी नियमित करण्यासाठी मदत करू शकते. आल्या सोबत सुंठ देखील वेदना कमी करण्यास मदत करते. नियमित मासिक पाळी करण्यासाठी तुम्ही आल्याचे सेवन कच्चे किंवा चहा मध्ये घालून करू शकता.

दालचिनी

दालचिनी मध्ये हायड्रॉक्सिक कॅल्कोन मुबलक प्रमाणात आढळते. मासिक पाळी पाळी दरम्यान हायड्रॉक्सिक कॅल्कोन इन्सुलिनची पातळी नियंत्रणात ठेवते. यामुळे वेदनेपासूनही आराम मिळू लागतो.

टीप : वरील गोष्टींसाठी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रामुख्याने महिलांना मासिक पाळी च्या संबंधित समस्यांना झुंज …

पुढे वाचा

Health

Join WhatsApp

Join Now