‘प्रत्येकवेळी अभिमान वाटेल अशी कामगिरी केली’, प्रियांकाकडून मेरीकोमचं कौतुक

मेरी कोम

मुंबई : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची बॉक्सर मेरी कॉमचा राऊंड १६ फेरीत झालेल्या लढतीत मेरीचा पराभव झाला आहे. मात्र पराभवानंतर मेरी कॉमने केलेल्या कृत्यामुळे चाहत्यांची मने तिने जिंकली आहे.ऑलिम्पिक स्पर्धेत ५१ किलो वजनी गटात गुरुवारी भारताची अनुभवी बॉक्सर मेरी कॉमचा पराभव झाला. मात्र पराभवानंतर देखील  अनेकांनी मेरी कोमच्या कामगिरीचं कौतुक केले. तसेच अभिनेत्री प्रियांका चोप्राने देखील मेरीचं कौतुक केलं.

प्रियांका ट्विटरवर मेरी कोमचा एक फोटो शेअर करत म्हणाली, ‘खरे चॅम्पियन असे दिसतात. खूप छान मेरी कोम! जिद्द आणि निष्ठेच्या जोरावर पुढे जाणं शक्य आहे हे तू दाखवून दिले आहे. तू आम्हाला प्रेरणा दिली आहे, प्रत्येक वेळी तू आम्हाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे.’ असे म्हणत प्रियांकाने मेरी कोमची स्तूती केली आहे. पराभव झाल्यानंतर मात्र मेरी कॉमने प्रतिस्पर्धी वेलेसिंयाची गळाभेट घेतली आणि तिचे आभिनंदन केले. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा ही मेरी कॉमची अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा ठरु शकते.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने ‘मेरी कोम’ या सिनेमामध्ये भारताची बॉक्सर मेरी कोमची उत्तम भूमिका साकारली होती. या सिनेमासाठी प्रियांका चोप्राने बॉक्सिंगचे धडे घेतले होते. तिने केलेली मेहनत या सिनेमातून पहायला मिळली होती. या सिनेमातील प्रियांकाच्या भूमिकेचे कौतुकही करण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या