IND vs AUS : ‘आयपीएलमधील कामगिरीमुळे आत्मविश्वास वाढला;आता मी दबावमुक्त झालोय’

mohammad shami

नवी दिल्ली : कोरोनाच्या सावटात देखील आता भारत-ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. वन डे,टेस्ट,आणि टी २० या तिन्ही प्रकारतील सामने खेळण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. भारतीय क्रिकेट संघ एक आठवड्यापासून ऑस्ट्रेलियात आहे . संघातील खेळाडू क्वारंटाईनमध्ये आहे. त्याचबरोबर संघातील खेळाडू सरावही करत आहेत.

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होत आहे. एकदिवसीय मालिकेला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया नेट्समध्ये जोरदार सराव करत आहे. ‘

नुकतीच भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची मुलाखत घेण्यात आली आहे.बीसीसीआय डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत शमीने दिलखुलास गप्पा मारल्या.आयपीएलमधील कामगिरीमुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे मी सध्या सकारात्मक मनस्थितीत आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्याने मी दबावमुक्त झालोय. या आत्मविश्वासामुळे मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहे’, असं टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी म्हणाला आहे.

महत्वाच्या बातम्या