‘कोरोनाचं भयान संकट जाईपर्यंत आपण घरातच नमाज अदा करावी’; नवाब मलिक यांचं आवाहन

टीम महारष्ट्र देशा –  कोरोनामुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन आहे. प्रशासन वारंवार गर्दी टाळण्याचं आवाहन करत आहे. मात्र अशाही परिस्थिती काही मुस्लिम धर्मीय नमाज अदा करण्यासाठी मशीदीत जात असल्याचं दिसून आलं आहे. आता मंत्री नवाब मलिक यांनी याच मुस्लिम बांधवांना विनंती केली आहे.

‘माझ्या सगळ्या मुस्लिम बांधवांना मी विनंती करतो की कोरोनाचं एवढं भयान संकट जाईपर्यंत आपण घरातच नमाज अदा करावी. शुक्रवारची (जुम्मा) नमाज देखील आपण मशीदीत न जाता आपल्या घरीच अदा करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.’

Loading...

‘कोरोनापासून आपला बचाव करायचा असेल तर आपण घरातच बसलं पाहिजे. गर्दी टाळली पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग खूर गरजेचं बनलं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण घराबाहेर पडू नये, असं त्यांनी म्हटलं आहे.’

दरम्यान, लोकांनी गर्दी टाळावी म्हणून शासन वारंवार आवाहन करत आहे. लोकांच्यामध्ये देखील आता जागरूकता येऊ लागली आहे. काही मुस्लिम धर्मीय आपली जबाबदारी ओळखून नमाज घरीच अदा करत आहेत. मात्र काही मुस्लिम धर्मियांकडून सरकारच्या आदेशाला हरताळ फासला जात होता. आता मलिकांच्या आवाहनानंतर सकारात्मक बदल दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाऊ लागली आहे.

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात