‘जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहचत नाही, ना मदत, ना दिलासा’

मुंबई : वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी सात वाजता जनतेशी संवाद साधला आहे. ‘सद्या लॉकडाऊनची भीती टळली असली, तरी नागरिकांनी मास्क वापरणे, हात धुणे, सुरक्षित अंतर पाळणे हे गरजेचे आहे. अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल व नामुष्कीने लॉकडाऊन करावा लागेल’, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानानंतर ‘मी जबाबदार’ ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. आपण आपली जबाबदारी ओळखून वेळोवेळी हात धुणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे हे या मोहिमेत आपण स्वतः सर्वानी पाळायचं आहे, असं आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भाष्य केले आहे. ‘माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय. पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही’, उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याला उपाध्याय यांनी शेलक्या शब्दात प्रत्यूत्तर दिले आहे.

‘तुम्ही घरात बसून आहात. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता संकटात आहे. ती मदतीचा हात मागते. त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहचत नाही, ना मदत ना दिलासा’, अशा शब्दात उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या