मुंबई : मुंबईतील मालाड परिसरातील क्रीडांगणाच्या नावावरुन सध्या प्रचंड वाद सुरु आहे. या क्रीडांगणाला टिपू सुलतान नाव देण्यावरुन भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते आमनेसामने आले आहेत. यावरुन आरोप प्रत्यारोपाच्या फेरी एकमेकांवर झाडल्या जात आहेत. आता मुंबईतील भाजप आमदार अमित साटम यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले आहे. त्यात या क्रीडांगणासाठी निधी अवैध खर्च केला जात असून जनतेच्या पैशांचा चुराडा होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पालकमंत्री@AslamShaikh_MLAहे अवैधरित्या क्रीडांगण बांधून जिल्हानियोजनाचा निधी अवैध जागेवर खर्च करत आहेत. ह्या प्रकारात जनतेच्या पैशांचा चुराडा होत असून मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली की या विषयाची सखोल चौकशी करावी व जे आरोपी आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. pic.twitter.com/JJQpyoQHrQ
— Ameet Satam (@AmeetSatam) January 28, 2022
भाजप आमदार अमित साटम यांनी हे पत्र ट्विट केले आहे. त्यात साटम म्हणतात, ‘पालकमंत्री अस्लम शेख हे अवैधरित्या क्रीडांगण बांधून जिल्हानियोजनाचा निधी अवैध जागेवर खर्च करत आहेत. ह्या प्रकारात जनतेच्या पैशांचा चुराडा होत असून मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली की या विषयाची सखोल चौकशी करावी व जे आरोपी आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी.’ अशी मागणी आमदार साटम यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात आमदार साटम म्हणतात, “पत्र लिहताना माझी द्विधा मनस्थिती होत आहे. कारण तुम्हाला मुख्यमंत्री म्हणू की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून साद घालावी. यामुळेच मी समस्त हिंदूतर्फे तुमच्या दोन्ही पदाला साद घालण्याचे ठरवले. आपल्या मा. महापौर किशोरीताई पेडेणेकर एका बाजूला जाहीरपणे मान्य करतात की टिपू सुलतान क्रिडांगण नामकरणाचा फलक अवैध आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, तर दुसऱ्या बाजूला त्याचाच बचाव करण्यासाठी खोटे बनावटी दस्ताऐवज वापरताहेत.”
“वास्तविकतेत जर टिपू सुलतान नामफलक अवैध असले तर महापौरांनी ते उतरवले पाहिजे होते. पण पालक मंत्र्यांच्या बचाव कार्यातच त्या मग्न आहेत. धक्कादयाक बाब म्हणजे सदर जागा ही सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प व इतर कामांसाठी फेर फार क्रमांक ९०३ (मालमत्ता पत्रक संलग्न) प्रमाणे महसूल पत्रकात नोंदवलेली आहे आणि पालक मंत्री मात्र आपल्या राजकीय स्वार्थासाठी जनतेची दिशआभूल करून क्रिडांगण बांधतायेत, म्हणजेच अवैध वापर करतायेत. इतकेच नाही तर जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा सुद्धा अवैध कामाकरिता गैरवापर करतायेत.”
आपणास नम्र विनंती आहे की, यावर आपण त्वरीत मुख्य सचिवाद्वारे सदर बाबीची सखोल चौकशी करावी आणि गुन्हेगारास दंडीत करावे, ही विनंती. असे आमदार साटम यांनी पत्रात म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या
“गांजाप्रकरणातील अनुभवानुसार वाईनविक्रीच्या घोषणेची जबाबदारी नवाब मलिकांना दिली असावी”
“गांजाप्रकरणातील अनुभवानुसार वाईनविक्रीच्या घोषणेची जबाबदारी नवाब मलिकांना दिली असावी”
“विरोधात असताना दारूला विरोध आणि सत्तेत असताना प्रोत्साहन देण्याची भाजपची रणनीती आहे का?”
वाढत्या परीक्षा घोटाळ्यांमुळे संपूर्ण देशात मिलिट्री राज लावायला हवं- बच्चू कडू
शुद्धीवर नसलेल्या सरकारचा हा एक भरकटलेला निर्णय- प्रविण दरेकर