एका परिवाराची पूजा करणारे कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : एका परिवाराची पूजा करणारे कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत, असे टोले मारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाही वरून कॉंग्रेसवर हल्लाबोल केला.

केंद्रातली मोदी सरकारची चार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला सर्वाधिक हायटेक एक्स्प्रेस वेचं गिफ्ट दिलं आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वाधिक वेगवान समजल्या जाणाऱ्या ईस्टर्न पेरिफरल एक्स्प्रेस-वेचं उद्घाटन केले.