मुंबई : भाजप नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भरती या आधी देखील काही वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आल्या होत्या. आता त्यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून नोकरदार वर्गाबाबत त्यांनी अपमानकारक विधान केलं आहे. ब्यूरोक्रसी म्हणजेच नोकरशाहीला त्यांनी चप्पल उचलणारे म्हटले आहे.
नोकरशहा आमच्या चपला उचलतात असे वादग्रस्त विधान भाजप नेत्या उमा भारती यांनी केले आहे. त्या म्हणाल्या, ‘नोकरशहांना फार अधिकार नसतात, आम्हीच त्यांना पगार देतो, आम्हीच त्यांना बढती देतो असेही उमा भारती म्हणाल्या. नोकरशाही म्हणजे काहीच नाही, ते आमची चप्पल उचलण्यासाठी आहे. ते आमच्या चपला उचलतात. तुम्हाला काय वाटते नोकरशाह नेत्याला फिरवतात, तसे अजिबात नाही.’
‘आधी खाजगीत चर्चा केली जाते, नंतर नोकरशाह फाइल बनवून आणतात. आमच्या सांगण्याशिवाय ते काहीच काम करत नाहीत. त्यांना आम्ही त्याचा पगार देतो, त्यांना पोस्टिंग देतो. आम्हीच त्यांचे प्रमोशन आणि डिमोशन करतो. त्यांना कोणताही अधिकार नाही. नोकरशाहीच्या बहाण्याने आम्हीच राजकारण करतो,’ असे वादग्रस्त वक्तव्य उमा भारती यांनी केले आहे.
भाजप नेत्या उमा भारती यांनी जी "नोकरशहा आमच्या चपला उचलतात". अशी भाषा वापरली ही निषधार्ह आहे. जनतेच्या जोरावर 'दुधा तुपाच्या गुळण्या करणाऱ्या भाजप नेत्यांनी स्वतः ला मालक समजणारी भाषा अधिकाऱ्यांशी, नोकरदारांशी करू नये'. योग्य वेळी लोक ही मस्ती निश्चित उतरवतील लक्षात असू द्या! https://t.co/bXKdwInPEd
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 21, 2021
त्यांच्या या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी समाचार घेतला आहे. ‘भाजप नेत्या उमा भारती यांनी जी “नोकरशहा आमच्या चपला उचलतात”. अशी भाषा वापरली ही निषधार्ह आहे. जनतेच्या जोरावर ‘दुधा तुपाच्या गुळण्या करणाऱ्या भाजप नेत्यांनी स्वतः ला मालक समजणारी भाषा अधिकाऱ्यांशी, नोकरदारांशी करू नये’. योग्य वेळी लोक ही मस्ती निश्चित उतरवतील लक्षात असू द्या!’ असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- नोकरशाही म्हणजे चप्पल उचलणारे; भाजप नेत्या उमा भारती यांचे वादग्रस्त विधान
- दानवेंना मी या आठवड्यात दोनदा भेटलो, असेच भेटत राहिलो तर…; देसाईंच्या विधानामुळे चर्चांना उधाण
- मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा वाचण्याची ती पहिलीच वेळ असेल – राठोड
- राज्यपालांनी ‘ती’ मागणी करणे हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक; मुख्यमंत्र्यांचे जशास तसे उत्तर
- …अन् संजय राऊत तडक म्हणाले, ‘किरीट सोमय्यांना आम्ही ओळखत नाही’