जय शहा यांची पाठराखण करणाऱ्यांना शत्रू म्हणतात ‘खामोश’

टीम महाराष्ट्र देशा : आपल्या बेधडक स्वभावाने कायमच चर्चेत राहणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांनी आता आपला मोर्चा अमित शहा यांच्या पुत्राकडे वळवला आहे. शहा यांच्या मुलावर इतके गंभीर आरोप लावलेले असताना त्यांची पाठराखण का केली जातेय? सत्य काय आहे ते जगासमोर आलेच पाहिजे’ अस म्हणत शत्रुघ्न सिन्हा यांनी शहा पुत्र जय शहा यांची पाठराखण करणाऱ्यांना चांगलच फैलावर घेतल आहे.

दरम्यान, अमित शहा यांचा मुलगा जय शहा हा गुजरातमधील एक उद्योजक असून, त्याने ‘दी वायर’ या संकेतस्थळावर १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकल्यानंतर या सर्व प्रकरणाला जास्त हवा मिळाली. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर जय शहा यांच्या कंपनीच्या नफ्यात १६००० पटींनी वाढ झाल्याचं वृत्त प्रसिद्ध केल्याप्रकरणी त्यांनी हा खटला दाखल केला.

या सर्व प्रकरणी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि पियुष गोयल यांनी शहा यांची पाठराखण केली. तर, विरोधी पक्ष काँग्रेसने या सर्व प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावे, अशी मागणी केली आहे.Loading…
Loading...