नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी वाईट बातमी .

३ वर्षापूर्वी भाजप सरकार मोठा गाजावाजा करत सत्तेत आले. तरुणांच्या हाताला काम देऊ, त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन देत मोदी पंतप्रधान झाले. तरुणांसाठी स्टार्टअप इंडिया, मेकइन इंडिया, कौशल विकास योजना अशा कोट्यावधी रुपये खर्च करून योजना राबविण्यात आल्या,पण यातून मोठ्या प्रमाणत रोजगार निर्मिती झाली नाही.

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेली नोटाबंदी आणि त्यानंतर यंदाच्या जुलैमध्ये करण्यात आलेल्या जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे देशातील रोजगार क्षेत्रात मोठी मंदी निर्माण झाली आहे. भविष्यात ही परिस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे. नजीकच्या काळात उत्पादन क्षेत्रातील रोजगार तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी घटतील, असे ‘टीमलीज सर्व्हिस लिमिटेड’ने म्हटले आहे. ही कंपनी भारतातील आघाडीच्या नोकरभरती कंपन्यांपैकी एक आहे. याशिवाय, अन्य सर्वेक्षणांमध्ये पुढे आलेल्या माहितीनुसार रोजगार क्षेत्रातील परिस्थिती तितकीश निराशाजनक नाही. मात्र, वर्षाला १ कोटी रोजगार निर्माण करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारला अजून बराच पल्ला गाठायचा असल्याचे या सर्वेक्षणांमध्ये म्हटले आहे.