मुंबई: स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेमधील अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राजकीय भूमिका मांडल्याने त्यांना मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणावर अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच आता किरण माने यांनी स्वतः या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
…तर ही वृत्ती अशीच फोफावत जाणार-
मला सांगितलं जातं तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधात आहात. पण मग मी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत त्यांच्या बाजूनेही पोस्ट लिहिली आहे. ती पोस्ट राज्य सरकारच्या विरोधात आहे. कोणतंही सरकार आलं तरी त्यांच्या विरोधात मी पोस्ट करणारच. तो माझा हक्क आहे. अशी तटस्थ भूमिका किरण माने यांनी मांडली आहे. तसेच याअगोदरही अनेक कलाकारांनी अशी भूमिका मांडलेली आहे. मात्र आपण जर या पुढील काळात बोललं नाही तर ही वृत्ती अशीच फोफावत जाणार असा संतापही माने यांनी व्यक्त केला आहे.
…ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला, तुकाराम महाराजांना विरोध करणारे
आज सत्ता काँग्रेसची असती तरी मी त्यांना जाब विचारला असता. हे सजग नागरिकाचे कर्तव्य आहे. राजकारणावर बोलू नको. राजकारणावर लिहू नको हे बोलणे योग्य नाही. आज सर्व गोष्टीचे दर हे राजकारण ठरवत आहे. या आधीदेखील आम्ही कॉलेजमध्ये असताना राजीव गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या एकांकीका केल्या आहेत. मला विरोध करणारे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला, तुकाराम महाराजांना विरोध करणारे याच प्रवृत्तीचे लोक आहेत. असा आरोपही किरण माने यांनी केला आहे.
मी कायमच…
मी कायमच तिरकस शैलीत राजकीय पोस्ट करत असतो. मात्र, काही लोकांना मी जाणीवपूर्वक त्यांच्याबाबत लिहित असल्याचा समज आहे. मी एक पोस्ट केली होती. त्यात आमच्या नाटकाला एक किंवा दोन प्रेक्षक असले तरी हाऊसफुल्ल असल्यासारखं जीव ओतून आम्ही काम करतो, असं मी म्हटलं होतं. त्यात काही मी चुकीचं लिहिलं असं वाटत नाही, असेही ते म्हणाले आहेत. तसेच मी एखाद्या नेत्याबाबत चांगली पोस्ट लिहिली म्हणजे मी त्या पक्षाचा झालो असं होत नाही. मी आजवर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार मांडत आलो आहे आणि मांडत राहणार. विद्रोही तुकारामाचे विचार मी मांडत आलो आहे आणि ते मी आजच्या काळाशी जोडतो आहे. त्यामुळे बहुजनांचेच नाहीतर सामान्य लोकांचे जगणे या पुढील काळात अवघड होणार आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत आवाज उठवला नाही तर पुढील काळात सामान्य व्यक्तीच्या सर्व गोष्टींवर बंधन येतील. माझ्या पोस्टमुळे मला ट्रोल केले जात आहे. अश्लील भाषा वापरली जात आहे. पण मी खचलो नाहीये. ही विषारी भाषा दिवसेंदिवस वाढत चालली आहे याला कुठेतरी आळा बसणे गरजेचे असल्याचेही किरण माने यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “….भूमिकेमुळे एखाद्या कलाकाराला मालिका सोडण्याची वेळ यावी, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खुनच”, रोहित पवारांची टीका
- अर्जुनसोबत ब्रेकअपच्या बातम्यानंतर मलायकाची पोस्ट, म्हणाली..
- औरंगाबादेत महामेट्रोची श्रेयवादाची लढाई; भाजप-शिवसेना कि एमआयएम श्रेय कुणाचे?
- मत मागताना जी लोक झुकलेली असतात, तीच नंतर ताठ होतात- मुख्यमंत्री ठाकरे
- “BMC जगातील एकमेव महानगरपालिका जिच्याकडे ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’वर 80 पेक्षा अधिक सेवा आहेत”
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<