“जगाला ज्ञान देणारी लोकं मुर्ख असतात”; सुयश रायने केलं कंगनाला ट्रोल

कंगना

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत सोशल मिडीयावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. कंगना तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे सोशलवर नेहमी चर्चेत राहिली आहे. वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच कंगना चर्चेत असते. तिच्या या बिनधास्त स्वभावामुळे ती नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसते.

सध्या देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर केलं आहे. अशातच वारंवार मास्क वापरणे सोशल डिस्टस्टिंगचे पालन करणे सांगण्यात येत आहे. यातच कंगना विना मास्क फिरताना दिसत असत आहे. यावरूनच कंगना ट्रोल झाली आहे. कंगनाचा व्हिडीओ  विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडीओत मुंबईतील डबिंग स्टुडिओत कंगना मास्क न घालता जाताना दिसत आहे.

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. त्याच सेलिब्रिटी पासून सामान्य जनतेने ही ट्रोल केलं आहे. अभिनेता सुयश राय म्हणाला, “जगाला ज्ञान द्यायचं असतं तर सगळ्या पुढे असतात, मुर्ख लोक अशी असतात”, अशी कमेंट करत त्याने कंगनाला ट्रोल केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या :