fbpx

वादग्रस्त विधान करणाऱ्या कमल हसन यांच्यावर दगडफेक

टीम महाराष्ट्र देशा : स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू असून त्याच नाव नथुराम गोडसे आहे, असे वक्तव्य करत अभिनेता कमल हसनने केले होते. याच विधानाचा निषेध म्हणून तमिळनाडूतील आरावकुरिची येथील सभेत त्यांच्यावर अंडी आणि दगड फेकण्यात आले आहेत.

कमल हसन हे आरावकुरिची येथे प्रचारासाठी आले होते. ते आपले भाषण आटोपून मंचावरून उतरत असताना दोन तरुणांनी त्यांच्यावर अंडी आणि दगड फेकत हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या हल्ल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच पुरेशी सुरक्षा व्यवस्था न पुरवण्यात आल्याने पोलिसांवर टीका करण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना कमल हसन यांनी ‘आता राजकारणाची पातळी खालावत चालली आहे. मात्र अशा प्रकारांमुळे मी घाबरलेलो नाही. प्रत्येक धर्मात त्यांचे स्वत:चे दहशतवादी आहेत. आम्ही खूप पवित्र आहोत असा दावा कुठलाही धर्म करू शकत नाही. प्रत्येक धर्मात अतिरेकी होते हे इतिहास सांगतो, असं विधान केले आहे.