जनतेला विकास करणारे लोकप्रतिनिधी नकोत, फक्त आश्वासने देणारे मंत्री पाहिजेत-नारायण राणे

नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा: कोकणात अनेक नेते होऊन गेले, तरीही कोकण मागे का राहिले आहे याचा विचार करणे गरजेचे असून, सत्तेत नसूनही माझे राजकीय वजन कायम आहे. कारण मी सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता आहे. गरिबांच्या हालअपेष्टा मला माहीत आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी मी प्रयत्न करणार आहे. मला मंत्रिपदाची आशा मुळीच नाही. कोकणी जनतेचा विकास करणे हे माझे ध्येय आहे. पण आज जनतेला विकास करणारे लोकप्रतिनिधी नकोत, फक्त आश्वासने देणारे मंत्री पाहिजेत, अशी नाराजी राणे यांनी व्यक्त केली आहे.

शेर कधी घायाळ होत नाही, तो दुसऱ्याला घायाळ करतो. विकास करण्यासाठी राजकीय वजन आणि अभ्यास लागतो.सत्तेत नसूनही माझे राजकीय वजन कायम आहे. कारण मी सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता आहे, अस सुधा नारायण राणे म्हणाले आहेत. होडावडा महोत्सव २०१७ चे उदघाटन नारायण राणे यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.