जनतेने कॉंग्रेसच्या घोटाळेबाजपत्रापासून सावध रहावे : नरेंद्र मोदी

टीम महाराष्ट्र देशा : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक पक्ष जनमानसात जाऊन प्रचार करत आहेत तर देशातील गरीब जनतेसाठी आता प्रत्येक पक्ष व्याकुळ झाला आहे. त्यामुळे देशातील गरिबांसाठी आता विरोधक आणि सत्ताधारी हितकारी योजनांच्या जोरदार घोषणा करत आहेत. मंगळवारी कॉंग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यावेळी आम्ही गरिबांना मोदी सरकार सारखी खोटी आश्वासन या जाहीरनाम्यातून देणार नाहीत अशी टीका नरेंद्र मोदी यांच्यावर केली होती. तर आता हाच मुद्दा उचलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचलप्रदेश येथील पिसघाटमध्ये जनसभेत काँग्रेसच्या जाहीरनाम्याला घोटाळेबाजपत्र अशी टीका केली आहे.

आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचलप्रदेश दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी कॉंग्रेसच्या जाहिरनाम्यापासून सावध रहा असे आवाहन तेथील जनतेला केले आहे. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की , ‘आम्ही गॅस देण्याचे आश्वासन नाही दिले होते तरी सुद्धा आम्ही ७ कोटी पेक्षा जास्त उज्जवला गॅस सिलेंडर लोकांना दिले. आरोग्याच्या नावावर मोठ्या गोष्टी नाही केल्या मात्र आम्ही आयुष्मान योजना लागू करून गरीब नागरिकांना मोफत उपचार दिला. एकीकडे हेतू प्राप्त करणारी सरकार आहे. तर दुसरीकडे घोटाळेबाजपत्र आहे जे खोट्या आश्वासनाने भरलेले आहे. या घोटाळेबाजपत्रापासून सावध रहा.’

दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाचा जाहीरनाम प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यातून कॉंग्रेस ने शेतकऱ्यांसाठी आणि समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या घोषणा केल्या आहेत.