fbpx

जनताच म्हणतेय ‘अब की बार, बस कर यार’

टीम महाराष्ट्र देशा – देशातील आणि राज्यातील जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारला जनता कंटाळली आहे. आता जनताच म्हणत आहे की, ‘अब की बार, बस कर यार’, अशी टीका विरोधकांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. पेण येथील कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत ते बोलत होते.

यावेळी चव्हाण म्हणले की, येणाऱ्या निवडणुकीत जनता भाजप सरकारला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही.महाराष्ट्रावर पाच लाख कोटींचे कर्ज करून हे सरकार फक्त जाहिरातीवर खर्च करत आहे.

या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे तीनवेळा भूमिपूजन केले. मात्र ते स्मारक झाले नाही. स्मारकासाठी शंभर कोटींचा निधी मंजूर केला. पुढील निवडणुका होईपर्यंत कोणतेही स्मारक हे पूर्ण करणार नसल्याची टीका अशोक चव्हाण यांनी यावेळी केली.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार हुसेन दलवाई, जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप, महिला जिल्हाध्यक्ष श्रद्धा ठाकूर, प्रवक्ते सचिन सावंत, महेंद्र घरत, ज्येष्ठ नेते बाळाजी म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत पाटील, प्रभारी तालुकाध्यक्ष अशोक मोकल, माजी सभापती सुरेश म्हात्रे यांचे पदाधिकारी उपस्थित होते.