सुन्नी मुस्लीमांनी शिया समाजाच्या इफ्तार पार्टीत सहभागी होऊ नये – दारुल उलूम

blank

नवी दिल्ली : कायमच आपल्या वादग्रस्त फतव्याने चर्चेत असलेल्या दारुल उलूमनाने आता आणखी एक वादग्रस्त फतवा जारी केला आहे. या नव्या फतव्यानुसार शिया समाजाच्या इफ्तार पार्टीत जाण्यास सुन्नी समाजाला मज्जाव करण्यात आला आहे. शिया समाजाच्या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी होऊ नये असा आदेशच दारुल उलूमने दिला आहे.

रमजान महिन्यात शिया समाजाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या इफ्तार पार्टीला सुन्नी समाजाने जावं की नाही असा लिखित स्वरुपातला प्रश्न काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने दारुल उलूमला विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर देताना दारुल उलूमने थेट फतवा काढून शिया मुसलमानांच्या इफ्तार पार्टीत न जाण्याचं सुन्नी समाजाला बजावलं आहे.

दारुल उलूमच्या तीन मुफ्तींच्या खंडपीठाने प्रश्नाचं उत्तर देताना सुन्नी समाजासाठी हा फतवा काढला. फतव्यामध्ये, इफ्तार पार्टी असो किंवा लग्न असो, पण शियांच्या पार्टीमध्ये सुन्नी समाजाने खाणं-पिणं टाळावं असं सांगण्यात आलं आहे.