“महाराष्ट्राच्या जनतेला ह्याच संकटांच्या खड्ड्यात नेऊन ठेवलंय”, सदाभाऊंनी साधला धनंजय मुंडेंवर निशाणा
मुंबई: माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावर टीका करताना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना निशाण्यावर धरले आहे. सदाभाऊ यांनी धनंजय मुंडे यांचा एक फोटो पोस्ट करत त्याचा संदर्भ मविआ सरकारच्या कारभाराशी केला आहे. “महाराष्ट्राच्या जनतेला ह्याच संकटांच्या खड्ड्यात नेऊन ठेवलयं आपण आणि हे वास्तव न बुजणारं आहे. आणि अशा खड्डयाच दर्शन आपण अखंड महाराष्ट्राला करून दिल्याबद्दल धनजय मुंडे साहेब धन्यवाद.”, असे ट्वीट सदाभाऊ खोत यांनी केले आहे.
सदाभाऊ खोत यांनी ट्वीट केलेल्या फोटोत धनंजय मुंडे खड्ड्यांसोबत सेल्फी घेतना दिसून येत आहेत. हा फोटो धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना काढला होता. गंगाखेड-परभणी रस्त्यावर पडलेल्या खड्यांसोबत सेल्फी काढत त्यांनी त्यावेळी “आदरणीय चंद्रकांत दादा,गंगाखेड -परभणी रस्त्यावरील हे पहा खड्डे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात इतके विक्रमी खड्डे झाले आहेत की ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ आता दखल घ्यावी. रस्ते दुरुस्तीवर मागील ४ वर्षात खर्च केलेले हजारो कोटी रु. नेमके कोणाच्या खिशात गेले?”, असा सवाल केला होता. हा फोटो २०१८ सालचा असून त्याचा संदर्भ आजच्या परिस्थितीशी लावत सदाभाऊ खोत यांनी मविआ सरकारला निशाण्यावर धरले आहे.
जनतेला ह्याच संकटांच्या खड्ड्यात मविआ सरकारने नेऊन ठेवले आहे. अशा खड्डयाचे दर्शन आपण अखंड महाराष्ट्राला करून दिल्याबद्दल धनजय मुंडे साहेब धन्यवाद. असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
“…असल्या भेकड धमक्यांना भाजप भीक घालत नाही”, ‘त्या’ घटनेवरून भातखळकरांचा राष्ट्रवादीला इशारा
“अजित पवार हुशार राजकारणी असून वेळ बरोबर मारून नेतात”, चंद्रकांत पाटलांचा टोला
“The Kashmir Files चित्रपटास करमुक्त करणार नाहीत ते सर्व…”; संजय राऊतांचा भाजपला टोला
‘त्या’ हिंसेवर पाणी टाकण्याऐवजी तेल ओतण्याचे काम भाजपवाले करतायेत; संजय राऊतांचा आरोप
“… तरच भाजपविरोधी आघाडीस बळ मिळेल व ‘यूपीए’चा जीर्णोद्धार शक्य होईल”,- संजय राऊत