बंगालचे लोक हुश्शार! पक्षांतर केलेल्यांना मतदारांनी नाकारले

bangal

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर अनेक प्रकार समोर येत आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपला बंगालच्या नागरिकांनी नाकारले आहे. शिवाय तृणमूल काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बहुतांश उमदेवारांना जनतेने नाकारल्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला आहे.

तृणमूल सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शुभेंदू अधिकारीसारख्या काही बाहूबली नेत्यांनी प्रतिस्पर्धी तृणमूल उमेदवारांचा पराभव केला आहे. अधिकारींनी ममता बॅनर्जींचा पराभव केला असला तरी राज्यातील माजी मंत्री राजीब बॅनर्जी, सिंगूरचे माजी आमदार रबींद्रनाथ भट्टाचार्य, अभिनेता रूद्रनील घोष व हावडाचे माजी महापौर रथिन चक्रवर्ती या भाजपच्या उमेदवारांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला.

विधानसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर तृणमूलमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राजीव बॅनर्जींचा दोमजूर विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. यापूर्वी ते लागोपाठ दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. पक्षाने तिकीट नाकारल्याने भाजपमध्ये गेलेले भट्टाचार्य यांचा सिंगूर येथील सत्ताधारी पक्षाचे उमदेवार बेचाराम मन्ना यांनी २६ हजार मतांनी पराभव केला. या जागेवर पुनर्मतदानाची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे.

रूद्रनील घोष यांचा तृणमूल काँग्रसचे नेते शोभनदेब चट्टोपाध्याय यांनी भवानीपूर मतदारसंघातून २८ हजार मताने पराभव केला. शिवपूरचे भाजप उमदेवार व माजी महापौर रथिन चक्रवर्ती यांचा तब्बल ३२ हजार मताने पराभव झाला. क्रिकेटमधून राजकारणात प्रवेश केलेले तृणमूलचे मनोज तिवारी यांनी त्यांचा पराभव केला.

महत्वाच्या बातम्या