लोकांना मनमोहन सिगांसारख्या सुशिक्षित पंतप्रधानांची गरज; केजरीवाल यांची मोदींवर टीका

नवी दिल्ली – आपचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची स्तुती केलीये. मनमोहन सिंग यांची स्तुती करताना देशाला त्यांच्यासारख्या सुशिक्षित पंतप्रधानांची आवश्यकता असल्याचं म्हंटलं आहे. केजरीवाल यांनी आपल्या या वक्तव्यामधून पंतप्रधान मोदींवर निशाना साधला आहे. या पूर्वीही अनेकवेळा आपकडून मोदींच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी रुपयाचं मूल्य कमी होत असल्याच्या विषयावरील वॉल स्ट्रिट पत्रिकेतील एक बातमी ट्विटरवर शेअर करत लिहिलं आहे की, ‘लोकांना मनमोहन सिंग यांच्यासारख्या सुशिक्षित पंतप्रधानाची कमतरता जाणवत आहे. आपला पंतप्रधान सुशिक्षित असला पाहिजे असं लोकांना वाटत आहे’.

यावेळी अरविंद केजरीवाल यांनी सध्या दिल्लीत उभं राहिल्या पाणी समस्येवर बोलताना घाणेरडं राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला. त्यांनी ट्विटरवर लिहिलं की, ‘भाजपा दिल्लीकरांसोबत घाणेरडं राजकारण करत आहे. दिल्लीला २२ वर्षांपासून पाणी मिळत होतं. अचानक हरियाणामधील भाजपा सरकारने पाणी बंद केलं आहे. असं का ? कृपया आपल्या घाणेरड्या राजकारणाने लोकांना त्रास देऊ नये’. असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाना साधलाय.

You might also like
Comments
Loading...