लोक मला वेगळ्या चष्म्यातून पाहतात; अमृता फडणवीसांनी घेतला टीकाकारांचा समाचार

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक गाणं प्रदर्शित झालं आहे. त्यांच्या या गाण्याला काही दिवसांतच5 मिलीयन्स व्हिव्ज मिळाले आहेत. त्यांच्या गाण्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. पण अमृता फडणवीस यांच्या गाण्यांवर नेटीझन्स टीका ही करत असतात. एका कार्यक्रमामध्ये त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

जेव्हा माझं एखादं गाणं प्रदर्शित होत तेव्हा लोक मला वेगळ्या चष्म्यातून पाहतात.मी एका भाजप नेत्याची पत्नी आहे म्हणून मी काहीही म्हंटल किंवा लिहलं तर लोकांना वाटतं की, मी भाजपकडून प्रेरणा घेत लिहते आहे, असं अमता फडणवीस म्हणाल्या आहेत.

मी ट्विटरवर जे लिहते ते माझ्या विचारानुसार किंवा मला वाटतं ते मी ट्वीट करत असते. मी देवेंद्र फडणवीस यांची पत्नी किंवा माझा भाजपकडे कल आहे म्हणून मी लिहत असते. माझं गाणं ही माझी पॅशन आहे, त्यामुळे मी गाणं करत असते, असं स्पष्टपणे अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :