‘…इस सवाल का जवाब चाँद पे रहने वाले लोग भी दे सकते हैं ; अनुपम खेर यांनी घेतली ‘सोनी मॅक्स’ची फिरकी

अनुपम खेर

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. नेहमीच आपल्या मजेशीर पोस्ट मुळे चर्चेत असतात. यावेळी देखील त्यांनी सोशल मीडियावर मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टने सगळ्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी ट्विटद्वारे त्यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या सूर्यवंशम चित्रपटाची खिल्ली उडवली आहे.

सोनी मॅक्स या वाहिनीनं काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं. ‘हिरा आपले वडिल भानु प्रताप सिंह यांचं मन जिंकू शकेल का?’असा सवाल करत त्यांनी सूर्यवंशम या चित्रपटाची जाहिरात केली होती. हे ट्विट त्यांनी अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांना देखील टॅग केलं होतं. याच ट्विटवरुन अनुपम खेर यांनी या चित्रपटाची खिल्ली उडवली आहे.

‘हा..हा..हा..हा.. माझ्या प्रिय सोनी मॅक्सवाल्यांनो तुमचा हा प्रश्न पाहून माझं हसू थांबत नाही आहे. तुम्ही हा चित्रपट इतक्या वेळा दाखवला आहे की आता या प्रश्नाचं उत्तर चंद्रावर राहणारे लोक देखील देऊ शकतात.’; अशा आशयाची प्रतिक्रिया अनुपम खेर यांनी दिली. त्यांच्या या ट्विटचं  सध्या सोशल मीडियावर ट्रेंड चालू आहे. या ट्विटवरून नेटकऱ्यांनी देखील अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या