‘राज कुंद्रासारखे लोक पैसा कमावण्यासाठी काहीही करु शकतात’; राजू श्रीवास्तवची संतप्त प्रतिक्रिया

राजू श्रीवास्तव

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. फेब्रवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणात राज कुंद्राला १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर अनेक बॉलीवूड कलाकारांनी यावर आपले मत मांडले आहे, यातच आता राजू श्रीवास्तवने यांनी देखील मोठ वक्तव्य केल आहे.

राजू श्रीवास्तव म्हणाले की, ‘सध्या वेबसिरीजमध्ये फार अश्लीलता दाखवली जाते. भोजपुरी चित्रपटांमध्येही अश्लीलता दाखवली जाते. डबल मीनिंग असणारे संवाद, अश्लील गाणी यामध्ये असतात. याविरोधात मी आवाज उठवला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तक्रारही केली आहे. त्यातच आता राज कुद्रांचं हे घाणेरडं कृत्य समोर आलं आहे. आता लोक पैसा कमवण्यासाठी स्वत:चा धर्म आणि इमानसुद्धा विकायला तयार झाल्यासारखं वाटत आहे. काहीही दाखवलं जात आहे. देशाची सभ्यता आणि संस्कार यांच्याशी या लोकांनी काहीच देणघेणं नसते, यांना केवळ पैसे कमावायचे आहेत. आपल्या घरी फार पैसा आला पाहिजे एवढच यांचा हेतू असतो,’ अशा शब्दांत  राजूने कुंद्रा यांना सुनावले आहे.

पुढे ते म्हणाले, ‘यासाठी आपल्यासारखे लोकही जबाबदार आहेत. कायदा तर आपलं काम करेल. मात्र सामाजिक स्वरुपात आपण यांचा  केला पाहिजे. आपण या कलाकारांना लग्नांना, बर्थ डे पार्ट्यांना बोलवतो. बॉलिवूडमधील लोक तर अशा प्रकरणांवर शांतच राहतात. पोलीस कायद्यानुसार शिक्षा देतीलच पण बॉलिवूडमधील लोकांनी समोर येऊन अशा लोकांवर बहिष्कार टाकला पाहिजे. आपण सर्वांनी या लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची गरज आहे. शिवाय या लोकांना कुठेही बोलवू नये,’ असं मत राजू श्रीवास्तवने व्यक्त केलं आहे.

राज कुंद्राला कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काल राज कुंद्रा आणि दुसरा आरोपी रायन जॉन मायकल थार्प या दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यापैकी राज कुंद्राला सोमवारी रात्री तर थार्पला काल सकाळी अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP