महाराष्ट्रात दलित कुटुंबातील लोकं सुरक्षित नाहीत- जयंत पाटील

Dalit Boys Beaten, Paraded Nude For Swimming In Well In Maharashtra

मुंबई  – महाराष्ट्रात दलित कुटुंबातील लोकं सुरक्षित नाहीत. अल्पसंख्यांक सुरक्षित नाहीत. भाजपाच्या राजवटीमध्ये असे अनेक अमानुष प्रकार गेल्या साडेतीन वर्षात महाराष्ट्रात घडले आहेत. या घटनामुळे महाराष्ट्रात दलित,अल्पसंख्यांक समाजाने कसं जगावं हाच प्रश्न निर्माण झाला आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Loading...

जळगाव जिल्हयातील जामनेर तालुक्यातील वाकडी गावामधील दलित तरुणांवर झालेल्या अत्याचारावर जयंत पाटील यांनी भाजपावर जोरदार प्रहार केला.

महाराष्ट्रात जळगाव जिल्हयात जामनेर तालुक्यात वाकडी गावात दोन मातंग समाजाच्या दलित तरुणांना विहिरीत पोहोल्याबद्दल नग्न करुन पट्ट्याने मारहाण करुन त्यांची धिंड काढण्याचा प्रकार झाला त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निषेध करण्यात येत आहे.

ज्यांनी ही घटना केली,कृत्य केले त्यांना अट्रोसिटी कायदयाअंतर्गत ताबडतोब अटक करण्यात यावी असे आवाहन जयंत पाटील यांनी सरकारला आणि पोलिसांना केले आहे. कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा असा प्रश्न या घटनेनंतर भाजपाला विचारावासा वाटतो. अशापध्दतीने महाराष्ट्रात दलितांवर,अल्पसंख्यांक समाजावर अन्याय होत आहेत. या महाराष्ट्रात कुणीच सुखी नाही असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.Loading…


Loading…

Loading...