सरकारमधील लोक गंभीर नाहीत; मुख्यमंत्री लक्ष दया – अजित पवार

मुंबई   – सभागृहाचे कामकाज गांर्भियाने सुरु नाही. विरोधी पक्षांचे आणि सत्ताधारी पक्षांचे २९३ चे बरेच प्रस्ताव प्रलंबित असून अनुदान मागणीवर सदस्य बोलताना कॅबिनेटमंत्री उपस्थित नसतात. सरकारमधील लोकच गंभीर नाही. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालावे आणि सदस्य बोलत असताना कॅबिनेटमंत्री सभागृहात असावेत अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. तर विधानसभेचे गटनेते जयंत पाटील यांनी सरकारने कारभार रेटून नेवू नये. सभागृहाचे तारतम्य ठेवावे असा सल्ला सरकारला दिला.

काल रात्री सभागृहात गंभीर प्रकार घडला आहे. विधानसभेचं कामकाज अध्यक्षांनी संपले असल्याचे घोषित केले मात्र संसदीय कार्यमंत्री आले आणि सभागृह पुन्हा सुरू करण्यात आले. हे सभागृहाच्या नियमात बसत नाही. सभागृहाचे कामकाज गांभीर्याने सुरू नाही. विरोधी पक्षांचे आणि सत्ताधारी पक्षांचे २९३चे बरेच प्रस्ताव प्रलंबित आहेत. अनुदान मागणीवर सदस्य बोलतात तेव्हा कॅबिनेट मंत्री उपस्थित नसतात.

तर विधानसभेचे गटनेते जयंत पाटील यांनी काल सभागृहाचे कामकाज उशिरापर्यंत चालले. एक बिल पास करण्याचे काम सभागृहात सुरू होते. बिल पास करत असताना प्रत्येक सदस्यांना त्यावर बोलायचे होते. काही सदस्यांना काल बोलू दिले नाही. भावनेच्या भरात आमदार बच्चू कडू यांनी राजदंड उचलला. माझी सरकारला विनंती आहे की सरकारने कोणत्याही गोष्टीत घाई करू नये. सदस्यांना बिलावर समाधानकारक उत्तर मिळत नसेल तर त्यांना बोलण्याचा अधिकार आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

You might also like
Comments
Loading...