दमदार अभिनेत्यांपेक्षा विशिष्ट वर्गातीलच लोकांना कामाची संधी अधिक दिली जाते – सैफ अली खान

saif ali khan

मुंबई- बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत याने नुकताच जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. लोकांनी अनेक स्टार्सला नेपोटीजमच्या नावाखाली लक्ष्य केलंय. सुशांत आऊटसाईडर्स असल्यानं अनेकांनी त्याला नाकारलं असंही बोललं जात आहे.

सुशांत जाऊन 1 आठवडा झाला आहे तरीही लोकांचा संताप शांत होत नाहीये. ट्विटरवर सतत काही ना काही ट्रेंड सुरूच आहे. यातच आता अभिनेता सैफ अली खान याने देखील आपलं मत व्यक्त केलं आहे.

दमदार अभिनेत्यांपेक्षा विशिष्ट वर्गातीलच लोकांना कामाची संधी अधिक दिली जाते. भारतात हे मोठय़ा प्रमाणावर होतं, असे विधान करीत अभिनेता सैफ अली खान याने बॉलीवूडमधील घराणेशाहीवरून सुरू असलेल्या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सैफ म्हणाला, ‘मी ज्या भूमिका साकारल्या त्याचा प्रभाव इतरांवर पडला. अनेकजण कठीण मार्गाने पुढे येतात तर काही जण सोप्या मार्गाने येतात. एनएसडी आणि फिल्म इन्स्टिटय़ूटमधून प्रतिभेच्या जोरावर काही पुढे येतात तर काही जण आमच्यासारखे आईवडिलांमुळे मिळालेल्या विशेषाधिकारामुळे पुढे येतात. अनेकदा चांगल्या अभिनेत्यांना संधी मिळत नाही. कधी कधी ती चांगली संधी ही विशेष अधिकार असलेल्या लोकांना मिळते असं सैफ ने म्हटलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बॉलीवूडमध्ये शीतयुद्ध सुरु झालं आहे. अनेक कलाकारांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरलं आहे. अभिनेत्री कंगना रनौत, दिग्दर्शक अभिनव कश्यप, अभिनेते प्रकाश राज यांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीची काळी बाजू जगासमोर आणली आहे.

या प्रकरणावरून नेटकऱ्यांनी देखील करण जोहर, एकता कपूर, सलमान खान, संजय लीला भन्साळी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. या सर्वांवर टीका होत असतानाच बिहारमधील एक वकिल सुधीर कुमार ओझा यांनी या सर्वांविरोधाततक्रार दाखल केली आहे.

एक मराठा लाख मराठा ! तानाजीचा झटकेबाज ट्रेलर रिलीज

स्वरा भास्करकडून करण-आलियाचे समर्थन, नेटकरी संतापले

लाडक्या तैमूर अली खानचा ड्रम वाजवताना व्हिडिओ व्हायरल