बाहेरचे लोक येऊन राज्यात दंगल घडवतात; मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता जिग्नेश मेवाणीवर शरसंधान

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात सध्या बाहेरचे लोक येतात आणि जातीवादाचे मुद्दे काढतात,असा थेट आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिग्नेश मेवाणी यांचं नाव न घेता केला आहे. त्याचबरोबर भीमा कोरेगावला जी काही घटना घडली त्याची चौकशीचे आदेश दिले आहेत, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणारच अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री

ज्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत तेच असं तणावपूर्ण वातावरण निर्माण करतात. पण आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता याला बळी पडणार नाही. विचारांच्या संकुचितपणामुळे काही लोक परस्परविरोधी उभे ठाकलेत. ज्यांच्याकडे मुद्दे नाहीत त्यांनीच हा अकारण वाद निर्माण केलाय. आज लोकांना तणावमुक्ती आणि विकास हवाय. विकास हा शांततेतच शक्य आहे. जी घटना झाली ती दुर्दैवीच आहे. पण म्हणून काही त्या घटनेचा राजकीय लाभ उकळण्याचा प्रयत्न कुणी करू नये आणि तशी संधी माध्यमांनीही कुणाला देऊ नये.

You might also like
Comments
Loading...