शेतकरी आंदोलनात भेंडीबाजारातील लोक घुसवले; दरेकरांची आंदोलनावर सडकून टीका

pravin darekar

मुंबई : कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आता महाराष्ट्राचे शेतकरीही सामिल झाले आहेत. राज्याच्या 21 जिल्ह्यांचे शेतकरी मुंबई रॅली काढून मुंबईत पोहोचले. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. आज आंदोलनादरम्यान झालेल्या सभेवेळी केंद्र सरकार व भाजपवर महाविकास आघाडीतील नेत्यांसह शेतकरी नेत्यांनी देखील टीकास्त्र सोडल्याचं दिसून आलं.

या आंदोलनावर भाजप नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सडकून टीका केली आहे. मराठा आंदोलकांची भेट घेऊन येताना शेतकरी आंदोलनासाठी शेतकरी असे फलक घेतलेल्या काही व्यक्ती दिसल्या. त्यांना जाऊन विचारले कुठून आला आहात, यावेळी त्यांनी भेंडी बाजारमधून असं उत्तर दिलं. काही लोक हे प्रामाणिकपणे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. मात्र सर्वाधिक लोक हे आणली गेलेली आहेत, अशी टीका दरेकर यांनी केली आहे.

अनेकांचा शेतीशी संबंध देखील नाही. हे केंद्र सरकारच्या विरोधात सुरु केलेलं एक अभियान आहे. तर,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुस्तकाचा आधार घेऊन सदाभाऊ खोत यांनी याआधी देखील पवारांचा या कायद्याला समर्थन असल्याची बाब समोर आणली आहे. संसदेमध्ये देखील पवारांनी विरोध केला नव्हता. तर असे कायदे आणण्याची सुरुवात ही काँग्रेस सरकारच्या काळापासूनच सुरु झाली होती, असा खुलासा देखील प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या