पालिकेचा धरसोडपणा : कचऱ्याच्या संदर्भातील फलकाचा फुटबॉल

jijai garden story kachra

पुणे –  राज्यात हळूहळू पुन्हा एकदा कचऱ्याचा प्रश्न डोके वर काढू लागला असून औरंगाबाद येथील कचरा प्रश्न आणि त्यावरून झालेलं राजकारण मागील काही दिवसात अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं . एका बाजूला देशाचे पंतप्रधान स्वच्छ भारत अभियानाचा नारा देऊन आता महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून सर्वश्रुत असणाऱ्या पुण्यात देखील वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

Loading...

पुण्यातील वारजे- माळवाडी परिसरातील नागरिकांना कचऱ्याचा प्रश्न त्रासदायक ठरू लागला असून महानगरपालिकेची कचरा टाकण्याची जागा निश्चित नसल्याने तसेच कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे म्हणा अथवा चुकीच्या वेळेमुळे मोठ्या प्रमाणावर कचऱ्याच साम्राज्य वाढत आहे. प्लास्टिकच्या पिशव्या,कचरा,ओला कचरा सर्वकाही एकाच ठिकाणी टाकले जात असल्याने या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य वाढत चालले आहे. महानगरपालिकेचा धरसोडपणा आणि या सगळ्या प्रश्नाची वस्तुस्थिती मांडणारे काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने वारजे परिसरातील जिजाई गार्डनसमोर महानगरपालिकेने फलक लावून या ठिकाणी कचरा टाकू नये अश्या आशयाचा फलक लावला. फलक लावल्याने नागरिकांचे त्याठिकाणी कचरा टाकणे थांबले नाही. कचरा टाकायला दुसरी जागा अथवा कचराकुंडी नसल्याने नागरिक त्या फलकाच्या खालीच कचरा टाकत होते. फलक लावून देखील कोणताही फरक पडत नसल्याचे पाहून पालिकेने हा फलक हटवला. मात्र आता पुन्हा पालिकेने त्याठिकाणी तोच फलक लावला असून परिस्थिती जैसे थे आहे.

नागरिकांशी जेव्हा आम्ही संवाद साधला तेव्हा कचरा टाकण्यासाठी दुसरी जागा उपलब्ध नसल्याने कोणतही पर्याय उपलब्ध नसल्याने याठिकाणी कचरा टाकला जात असल्याचे सांगितले. शिवाय कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे म्हणा अथवा चुकीच्या वेळेमुळे मोठ्या प्रमाणावर कचऱ्याच साम्राज्य वाढत असल्याचे मत व्यक्त केले.याशिवाय या परिसरातील हॉटेल व्यावसायिक देखील मोठ्या प्रमाणावर कचरा आणून टाकत असल्याची तक्रार या भागातील नागरिक करत आहेत. पालिकेने कचरा टाकू नये अथवा दंडात्मक कारवाईचा इशारा देणारा हा फलक लावला आहे तर दुसऱ्या बाजूला त्याच फलकाच्या खाली कचराकुंडी आणून ठेवली आहे.

दंडात्मक कारवाईचा इशारा देऊन सुद्धा नागरिक का जुमानत नाहीत याचा विचार पालिकेने करण्याची आवश्यकता असून, नागरिकांच्या प्रश्नावर त्यांच्याशी संवाद साधण्याची आवश्यकता आहे.या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य वाढत चालले असून नागरिकांचे आरोग्य पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे.

स्वच्छच्या माध्यमातून महापालिका घरोघरी जाऊन कचरा जमा करते मात्र काही नागरिक आणि व्यावसायिक त्या जागेवर कचरा टाकतातच त्यासाठी मागील १ महिन्यात २६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे नागरिकांनी स्वच्छच्या कर्मचाऱ्यांकडे कचरा द्यावा. 

-सुशील मेंगडे , स्थानिक नगरसेवकLoading…


Loading…

Loading...