‘लोकांना लस, औषधं मिळेना; पीएम केअर फंड कुठे आहे?’, ममतांचा मोदींना सवाल

mamta

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलवरील करांमधून केंद्र सरकारला मोठी कमाई मिळते. पेट्रोल-डिझेलवरील करांमुळे केंद्र सरकारच्या मिळकतीत तब्बल ८८ टक्क्यांची वाढ झाली आहे. सर्वसामान्यांना पेट्रोलचे दर आवाक्याबाहेर जात असले तरी केंद्राच्या तिजोरीत मात्र भरभराट झाल्याचे दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील कराच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात केंद्र सरकारच्या तिजोरीत तब्बल ३.३५ लाख कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे.

गेल्या वर्षी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क १९.९८ रुपये इतकं होतं. यात वाढ होऊन सध्या पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रतिलीटर ३२.९० रुपये इतके झाले आहे. डिझेलवरील उत्पादन शुल्क गेल्या वर्षी १५.८३ रुपये इतके होतं. यात वाढ होऊन सध्या डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रतिलीटर ३१.८० रुपये इतकं आहे. पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी याबाबतची माहिती सोमवारी संसदेत दिली.

या मुद्द्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला धारेवर धरले आहे. ‘३.७ लाख कोटी रुपये केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलमधून गोळा केले आहेत. हा पैसा ते कुठे खर्च करत आहेत. लोकांना लस, औषधे मिळत नाहीयेत. लोकांनी दिलेला पंतप्रधान मदत निधी कुठे आहे?’, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे. हुतात्मा दिनाच्या निमित्ताने ७ राज्यांमधील तृणमूलच्या कार्यकर्त्यांशी ममता बॅनर्जी यांनी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.

पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ केल्यामुळे यावेळी केंद्रानं कराच्या स्वरुपात तब्बल ३.३५ लाख कोटींचं उत्पन्न मिळवलं आहे. म्हणजेच केंद्र सरकारला बक्कळ फायदा झाल्याचं यातून स्पष्ट होतं आहे.रामेश्वर तेली यांच्या माहितीनुसार हा आकडा एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीतील आहे. महत्वाची बाब अशी की याआधीच्या वर्षात पेट्रोल आणि डिझेलवरील कराच्या माध्यमातून केंद्रानं केलेल्या कमाईचा आकडा १.७८ लाख कोटी इतका होता. त्यात यावेळी जवळपास दुप्पट वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP