जनतेला दिल्लीत होतंय त्या ‘गुजरात मॉडेलची’ अपेक्षा नाही: ‘या’ नेत्याची भाजपवर टीका

टीम महाराष्ट्र देशा – दिल्लीच्या जाफराबाद परिसरात २४ फेब्रुवारी भडकलेल्या हिंसेनंतर संपूर्ण दिल्लीमध्ये तणावाचं वातावरण आहे. सोमवारी झालेल्या हिंसाचारात दिल्लीच्या एका पोलीस कर्मचाऱ्यासह ९ पेक्षा अधिकांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावर असताना देशाची राजधानी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारवर धारेवर धरलं आहे. देशातील जनतेला भाजपकडून विकासाचं मॉडेल अपेक्षित होते. गुजरातचे दंगल मॉडेल नाही, असा टोला लगावत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर तोफ डागली आहे

Loading...

अनेक जण दिल्ली हिंसाचारात जखमी झाले आहेत. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उत्तर-पूर्व दिल्लीच्या बऱ्याच भागांत कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या सगळ्यात घडामोडींवर जयंत पाटील यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

दिल्लीतील हिंसाचाराच्या घटना अत्यंत धक्कादायक असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत. गुजरातमधील २००२ ची पुनरावृत्ती होवू नये याची काळजी राज्यकर्त्यांनी घ्यायला हवी, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका