अनेकदा लोक डोळ्यांनीच बलात्कार करतात – विद्या बालन

टीम महाराष्ट्र देशा: अनेकदा लोक डोळ्यांनीच बलात्कार करतात. कॉलेजला असताना व्हीटी म्हणजेच आताच्या सीएसटी स्टेशनवर एक भारतीय लष्करातील जवान आपल्या छातीकडं रोखून पाहत होता म्हणत बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनेने धक्कादायक आठवण सांगितली आहे. विद्याचा ‘तुम्हारी सुलु’ हा चित्रपट १७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या निमित्तानं ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या खास मुलाखतीत ती बोलत होती.

सध्या महिलांवरील लैंगिक शोषणा विरोधात #metoo कॅम्पेन राबवल जाता आहे. याबदल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विद्या बालन हिने तिच्या सोबत घडलेल्या घटना सांगितल्या आहेत. ‘महिलांचं लैंगिक शोषण कायमच होत आल आहे. आपल्यालाही अशा प्रसंगाला समोर जाव लागल असल्याचही विद्यान सांगितल आहे. ‘कॉलेजच्या दिवसांत मैत्रिणीसह सीएसटी स्टेशनला उतरून जात असताना एक भारतीय जवान माझ्या ब्रेस्टकडे बघत होता. थोड पुढं गेल्यावर त्याने मला डोळा मारला. मात्र या वागण्याचा संताप आल्याने आपण तुम्ही माझ्याकडं असे का बघताय आणि तुम्ही मला डोळा का मारला? असा प्रश्न मी त्याला केल्याची’ आठवण विद्या बालन हिने सांगितली आहे.

 

 Loading…
Loading...