fbpx

भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर जनतेचा आजही विश्वास : आठवले

टीम महाराष्ट्र देशा– राफेल कराराबाबत कोर्टाने काल महत्वपूर्ण निकाल दिल्यानंतर देखील आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वागत केलं आहे. अंतिम विजय हा सत्याचाच असतो याची प्रचिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आली असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे. भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर जनतेचा आजही विश्वास असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले आठवले ?
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसने राफेलबाबत केंद्र सरकारवर खोटे आरोप करीत धुरळा उडविला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने आरोपांची ही धूळ खाली बसली असून सत्य समोर आले आहे. नरेंद्र मोदींचे सरकार भ्रष्टाचार विरहित निष्कलंक असून आगामी काळात लोकसभा निवडणुकांत काँग्रेस खोट्या प्रचाराला जनता बळी पडणार नाही. अंतिम विजय हा सत्याचाच असतो याची प्रचिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आली. भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर जनतेचा आजही विश्वास आहे.

दरम्यान,कोर्टाच्या निर्णयानंतर तोंडघशी पडलेल्या राहुल गांधी यांनी आरोप करण्याची मालिका सुरूच ठेवली आहे. राफेल व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा कोणताही पुरावा नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोदी सरकारला क्लीनचीट दिली. पण राफेल व्यवहारात भ्रष्टाचार झालाच आहे असा दावा राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मित्र अनिल अंबानींना मदत केल्याचा मी सिद्ध करुन दाखवीन असे राहुल म्हणाले.