लोक आता नोकरी तरी वाचू देत अशी प्रार्थना करत आहेत ; भाई जगतापांची भाजपवर मार्मिक टीका

Bhai Jagtap and bjp

मुंबई : गेले ५ महिन्यांहून अधिक काळात देशासह जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. या संसर्गावरील लस अजून देखील निर्माणाधीन असून संशोधकांना ठोस यश लाभलेले नाही. सुरुवातीला या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आला. यामुळे देशातील सर्वच क्षेत्रांना आर्थिक फटका बसला असून कोट्यवधी लोकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे.

शेती, उद्योग, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांना हलाखीचे दिवस आले असून देशाचा जीडीपी देखील नीचांकी नोंदवला गेला आहे. यावरूनच आता कॉंग्रेस नेते भाई जगताप यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी कॉंग्रेस सरकारच्या काळ व सद्यस्थितीशी तुलना केली आहे. कॉंग्रेस काळात सहावा वेतन आयोग, सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठीच्या मागण्या लोक करत होते, तर आता किमान नोकरी तरी वाचू दे अशी प्रार्थना लोक करत आहेत, अशी मार्मिक टीका भाई जगताप यांनी भाजपवर केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गेल्या काही वर्षात रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली असून बेरोजगार युवकांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. दुसरीकडे आत्मनिर्भर भारतासह व्होकल फॉर लोकलचा नारा देणाऱ्या सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणल्याने कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेत आज राज्यव्यापी आंदोलनाचे आयोजन केले आहे.

महत्वाच्या बातम्या:-