बीड जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या गलथान कारभारामुळे लोकं मृत्युच्या दाढेत लोटले जात आहेत- आ. सुरेश धस

बीड: जिल्ह्यात कोरोनामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढत आहे तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे बीड जिल्ह्यात मृत्यूचे तांडव होण्यास सुरूवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यावर अशी वेळ आली आहे. सध्या कोरोना टेस्ट किट उपलब्ध नाहीत. लसीकरणाचे नियोजन नाही, बेडची अनुपलब्धता, रेमडीसेविरचा काळाबाजार यामुळे लोक मृत्यूच्या दाढेत लोटले जात असल्याची टीका आमदार सुरेश धस यांनी केली.

आष्टी येथील निवासस्थानी आयोजित पत्रपरिषदेत धस हे बोलत होते. जिल्ह्यात रुग्णांची तपासणी गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. याचे कारणही तपासणीसाठी लागणारे अँटीजन व आरटीपीसीआरची किटच उपलब्धता होत नाही. याचे सर्व अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले आहेत. मात्र त्यांना तपासणी किट कधी संपणार याची माहिती होत नाही का? असा सवाल धस यांनी परिषदेत बोलताना उपस्थित केला. कोरोनाच्या बाबतीत प्रशासनाचा बट्ट्याबोळ झालेला दिसत असून तपासणी किट नाही, लसीकरण नाही, यातून प्रसासानाचा नियोजनशून्य कारभार दिसून येत आहे.

प्रशासन आष्टी, पाटोदा व शिरूर भागात लसीकरणासह इतर वैद्यकीय सुविधा देण्याची गरज असतानाही जिल्हा प्रशासन या भागाला कमी साहित्य पाठवित असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. तसेच होम आयसोलेशन केलेले रुग्ण बिनधास्त समाजात वावर करीत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे धस यांनी सांगितले. सध्या काही विभाग खोऱ्याने पैसा ओढत आहे तसेच काही खासगी डॉक्टर व इतर काही विभाग रुग्णांची लूट करत पैसे कमावण्याचा गोरख धंदा करत असल्याची टीका धस यांनी केली.

महत्वाच्या बातम्या